Skip to content

आम्ही आपल्यासाठी मराठी माहिती संग्रह उघडत आहोत. या संकेतस्थळाचा उद्देश आहे विविध विषयांवरील सखोल माहिती मराठी भाषेत उपलब्ध करून देणे, जेणेकरून मराठी भाषिकांना आपल्या भाषेत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकेल.

इथे काय मिळेल?

  • स्थानिक माहिती: आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक माहिती.
  • राष्ट्रीय माहिती: भारतातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, प्राचीन संस्कृती, व्यक्तिमत्वे, आणि विविध विषयांवरील लेख.
  • आंतरराष्ट्रीय माहिती: जगभरातील देशांच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि विज्ञानाच्या प्रगतीची माहिती.
  • कुतूहल: आधुनिक विज्ञान, जगातील महान शोध, तंत्रज्ञान, निसर्गातील अद्भुत गोष्टी आणि इतर मनोरंजक विषयांची माहिती.

आमची उद्दिष्टे:

मराठी भाषेतून अधिकाधिक आणि सखोल माहिती उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. आमचं लक्ष आहे मराठी भाषिक वाचकांना विविध विषयांवरील सखोल माहिती सोप्या, स्पष्ट भाषेत प्रदान करणे, जेणेकरून त्यांना त्यांच्या भाषेत ज्ञानाचा आनंद घेता येईल.

आपल्या सहकार्याने ही ज्ञानयात्रा आणखी विस्तारित होईल! आमच्या या प्रवासाला आपला आशीर्वाद असावा!

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

– सुरेश भट